श्री विठ्ठल रुखमाई मंदिर, कापडणे


१. संस्थेचे नांव व पत्ता : श्री विठ्ठल भजनी मंडळ कापडणे, ता. जि. धुळे, दूरध्वनी - ९४२१५२६८९३

२. संस्था स्थापना सभासद संख्या : धुळे एफ / १२५५, दि. १७/१०/१९८६

३. संस्था स्थापनेचा उद्देश : श्री विठ्ठल रुखमाई मंदिर नवीन बांधणे व अल्प दरात सर्व जातीधर्माच्या लोकांना उपलब्ध करून देणे.

४. उत्पन्नाचा श्रोत, बांधकामासाठी निधी जमा करणे : आषाढी, कार्तिकी एकादशी पालखी सोहळा, अखंड हरीनाम टाळ व किर्तनी सप्ताह. प्रभातफेरी, भजन, पूजन, लोकनाट्य, दारूबंदी, हुंडाबंदी, स्त्रीभ्रुणहत्या, वृद्धावस्थेत आईवडीलांची सेवा इ. सार्वजनिक विधायक कार्याद्वारे वर्गणी व वस्तुरूपाने व रोख देणगी व श्रमदान करणे.

५. संस्थेची मालमत्ता स्थावर मिळकत : कापडणे सिटी सर्वे नं. ५६५ / ५५ x ४३ = २३६५ स्क्वे. फुट
श्री विठ्ठल रुखमाई मंदिर व सभामंडप : दप्तरी मुल्यांकन एकूण १५,४१४०३.३५ रु.
आजच्या बाजारभावाने मुल्यांकन : किमान ७० ते ८० लाख रुपये

६. संस्थेची भांडी, लायब्ररी : स्वयंपाकभांडी सर्व रु. १ लाख पर्यंत
भजनीसाहित्य रु. ५० हजार पर्यंत
लायब्ररी सर्व प्रकारचे धर्मग्रंथ

७. मंदिरात प्राणप्रतिष्ठा केलेले दैवत: १. श्री विठ्ठलरुखमाई, २. राधाकृष्ण, ३. महादेवपींड, ४. नऊ संतांच्या मुर्त्या, ५. श्री गणपती सरस्वती लक्ष्मी दर्शनी भागांवर

८. मंदिर बांधकाम व रंगकाम सहकार्य : संस्था स्थापनेपासूनचे सर्व तहयात सभासद, पदाधिकारी, ग्रामस्थ, मतदारापासून ते आमदारपर्यंत सर्व स्तरातील आश्रयदाते, नोकरी वा धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले आश्रयदाते यांच्या सहकार्याने

९. विशेष सहकार्य : सन २००५ ते २०१५ आजअखेर अध्यक्ष श्री डी. के. वाणी, सचिव श्री माळीसर व पुजारी श्री कालीदास जोशी यांच्या अनमोल सहकार्याने धुळे जिल्ह्यात असे एकमेव सुंदर मंदिर रंगकामासह पुर्णत्वास आले आहे. नियमीत ऑडिट होऊन आदर्श दप्तर ठेवले आहे.