सामाजिक / राजकिय कार्यकर्ते:


sthapana-1st-election

सामाजिक / राजकिय कार्यकर्ते:

  • भगवान विनायक पाटील
  • प्रमोदभाऊ गुलाबराव पाटील
  • नथ्थु जयराम माळी
  • बापु खलाणे
  • आत्माराम बळीराम पाटील: अध्यक्ष धुळे जिल्हा शेतकरी संघटना (भ्रमणध्वनी: ९४०४५७५२६७) अधिक वाचा...

    शेतकरी संघटनेचे ब्रिदवाक्य "जनसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या सुखाने आणि सन्मानाने जगण्यासाठी…" हेच ध्येय मानून शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्यासोबत १९८४ पासून छातीवर संघटनेचा बिल्ला लावून एकनिष्ठतेने कार्यरत आहे.
    शेतीमालाला रास्त भाव मिळावा 'हवे घामाचे दाम' म्हणून आंदोलने केले. भूविकास बँकेने शेतकऱ्यांच्या घरांवर वेळोवेळी आणलेली जप्ती रोखली. कांदा निर्यातबंदी, कापूस, ऊस झोनबंदी ह्या विषयांवर रास्तारोको केले. कलेक्टर कचेरीवर वेळोवेळी नेलेल्या मोर्चात सामील होऊन तुरुंगात गेलो.
    त्याचेच फलित म्हणून जिल्ह्यातील कार्यकर्ते व महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष श्री रवि देवांग यांनी माझी धुळे जिल्हा शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली. मी आजतागायत कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालो नाही.
    मी यापुढेही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांचे रोजमरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत राहील.

  • विश्वासराव आत्माराम देसले
  • अरविंद झुलाल पाटील: ग्रा. पं. सदस्य. खरा कार्यकर्ता सदस्य. (भ्रमणध्वनी: ९४२०६०१८९२) अधिक वाचा...

    ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर कापडणे गावात विविध योजनांच्या माध्यमातून अनेक समाजविधायक कामे हाती घेतली आणि ती पूर्णत्वास नेली.
    सामाजिक कार्य:
    १. सन २०१०-१५ वार्ड क्रं. १ मधील अंदाजीत रक्कम २१ लाखाची महिला सुलभ शौचालय.
    २. एकूण १५ लाखापर्यंत गांव अंतर्गत काँक्रिट रस्ते मंजुर व बाजारपेठेच्या (मुख्य रस्त्यासाठी) मंजुरी.
    ३. तसेच ३ ते ४ लाखापर्यंत महिला शौचालयांसाठी पाण्याचे टँक मंजुर.
    ४. एकूण ८ ते १२ लाखापर्यंत सिमेंट गटारी मंजुर.
    ५. गावात पार पडत असलेल्या प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांना नेहमी सहकार्य आणि प्रोत्साहन.

    मनोगत: मी सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करतांना गावांत विधायक बदल करण्याचे आणि गोर-गरिबांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचे जे स्वप्न बघितले होते ते साकार करण्यासाठी निवडून आल्यानंतर त्या दिशेनेच वाटचाल सुरु ठेवली.
    तसेच महिलांसाठी सुलभ-शौचालय असणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे हेच माझे ध्येय होते आणि मी ते पूर्ण केले.
    पाच वर्षांच्या कार्यकाळात उपसरपंच पदाची संधी मिळून देखील ती न स्वीकारता कापडणेकरांच्या मनात माझ्याबद्दल असणारा विश्वास जागा ठेवून मी गावासाठी खरा कार्यकर्ता सदस्य बनून राहिलो.

  • शरद हिंमत पाटील (राजा पाटील): ग्रा. पं. सदस्य, मा. उपसरपंच (भ्रमणध्वनी: ८८८८३८८८३३) अधिक वाचा...

    सन २०१० ते २०१५ या काळात ग्रामपंचायत सदस्य आणि २०१३ ते २०१४ मध्ये उपसरपंच पदावर असतांना अनेक विधायक कामे पार पाडली.
    सामाजिक कार्य:
    १. एकूण २-५ लाखापर्यंत काँक्रिटीकरण मंजुरी.
    २. पाटील वाड्यामधील १५ लाखापर्यंत महिला शौचालयांना मंजुरी.
    ३. गुरांसाठी ५ लाखापर्यंत पाण्याचे हौद मंजुर.

    मनोगत: ग्रामपंचायत सदस्य म्हणून संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करता यावे हि प्रामाणिक इच्छा मनात होती. पण मर्यादित कालावधीत शक्य तेवढी कामे पूर्णत्वास नेली. तसेच, जरी मी पुढील पंचवार्षिक मध्ये सदस्य म्हणून नसेन तरी माझी कार्यकुशलता व प्रोत्साहन गावाच्या प्रगतीसाठी सदैव उपलब्ध असेल.

  • दगाजी बुधाजी माळी: तंटामुक्ती अध्यक्ष (भ्रमणध्वनी: ७०३८१५६६६०) अधिक वाचा...

    सामाजिक कार्य:
    १. कापडणे गावाला एकूण २० लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळवून दिले.
    २. कापडणे गावाला ८७ गुण गुणांसह प्रथम स्थान प्राप्त करवून दिले.
    ३. सामाजिक सेवेत नेहमी नेहमी अग्रेसर.

  • भटू विश्राम पाटील: सक्रीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते. (भ्रमणध्वनी: ९४२१५२८८८४) अधिक वाचा...

    कार्यभार:
    १. सन २००७ तंटामुक्ती अध्यक्ष (कापडणे)
    २. सन २००७ मध्ये एकूण गावांच्या तंटामुक्ती अध्यक्षांचे प्रमुख.
    ३. एक गाव एक गणपती संकल्पना राबविणे.
    ४. गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर २००७ रोजी रक्तदान शिबीर.
    ५. सन २००५ मध्ये भा. ज. पा. तालुका कार्यकारणी चे सदस्य.
    ६. सन १९८९-९० धुळे जिल्हा सहाआसनी चालक-मालक संघटनेचे खजिनदार.
    ७. वंदे मातरम् रिक्षा युनियन अध्यक्ष.

  • भिमराव महादु पाटील: माजी ग्रा. पं. सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन (भ्रमणध्वनी: ९४२१४८४८५६) अधिक वाचा...

    सामाजिक कार्य:
    १. सतत ३५ वर्षांपासून विनाशुल्क हाड वैद्यकीय सेवा करीत आहेत.
    २. ग्रामपंचायत सदस्य असतांना इ. स. १९८५ मध्ये माळीवाडा व पाटीलवाडा मधील रस्ता मंजुर केला.
    ३. तसेच गावात सामाजिक न्याय, तंटामुक्ती अभियान राबविले.
    ४. शेतकऱ्यांना डाळींब, कांदे, कापूस यांसारखे नगदी पिके घेण्यास प्रोत्साहन दिले.
    ५. कापडणेकरांना सहकार्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर.

  • विलास हिंमत पाटील
  • किशोर भास्कर पाटील
  • शरद भिका बोरसे: प्रगतीशील शेतकरी (भ्रमणध्वनी: ९४२२०९०५७४)
  • नरेंद्र भटू पाटील
  • अरुण परशुराम पाटील: माजी ग्रामपंचायत सदस्य (भ्रमणध्वनी: ९५९५४८२९४२)
  • डॉ. नारायण व्यास
  • रोहिदास सखाराम पाटील: मा. केंद्र मुख्याध्यापक, विसरवाडी, जि. नंदुरबार (भ्रमणध्वनी: ८३०८०९७०७०)
  • देविदास गंगाराम खलाणे
  • राजेंद्र पंडीत खलाणे: प्रगतीशील शेतकरी (भ्रमणध्वनी: ९८९०४०२२९७ / ८८८८६४५३०९)
  • अभिमन भगवान माळी: J / E (P) इलेक्ट्रिकल (MCF) पॉवर वेस्टर्न रेल्वे, नंदुरबार विभाग (भ्रमणध्वनी: ९६०४८३५६४७ / ८८०६८३३६४७)
  • उत्तम बुधा माळी: वाहतुक निरीक्षक (प्रशिक्षण) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग (भ्रमणध्वनी: ९७६४८३३०९५ / ७५०७८९९७३०)
  • राजेंद्र बाबुराव पाटील
  • काशिनाथ दगा भिल: ग्रामपंचायत सदस्य, (भ्रमणध्वनी: ९८५०३५९६३२) अधिक वाचा...

    सामाजिक कार्य:
    सन २०१० ते २०१५ या काळात ग्रामपंचायत सदस्य असतांना अनेक सामाजिक कार्ये पूर्ण केली.
    १. ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होऊन प्रोत्साहन दिले.
    २. इंदिरा आवास योजनेअंतर्गत १३८ घरे मंजुर केली.
    ३. गावातील आदिवासी भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण मंजुर.
    ४. तसेच बसस्थानक पासून आदिवासी भागापर्यंत पूल मंजुर.

  • योगेश भगवान पाटील: एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता (भ्रमणध्वनी: ७७९८९६६७५२) अधिक वाचा...

    गरजवंतांच्या हाकेला "ओ" देणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून योगेश भगवान पाटील यांची सध्या जनमानसात ओळख आहे. निःस्वार्थ भावनेने अंग झाडून सामाजिक कार्यात झोकुन देणारा एक सामान्य कार्यकर्ता.

  • मनोज छबिलाल पाटील: जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित (भ्रमणध्वनी: ९७६७०९५५०६) अधिक वाचा...

    मनोज पाटील हे अभिनव प्रतिष्ठान व निसर्गमित्र समितीच्या माध्यमातून नानाविविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम गावात राबवत असतात. तसेच कोणत्याही सामाजिक वा राजकीय संघटनांमार्फत गावात राबविल्या जाणाऱ्या समाजविधायक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभागी होतात.
    पाणी व वृक्षदिंडीचे आयोजन, रोपवाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनातून पर्यावरण विकास कार्यक्रम, आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना २०१४ सालचा जिल्हा युवा पुरस्कार महाराष्ट्र दिनी (१ मे, २०१५ रोजी) एका समारंभात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दादा भुसे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

महिला राज:

  • सौ. निर्मलाबाई भिमराव पाटील: माजी सरपंच (भ्रमणध्वनी: ९४२१९८४८५६) अधिक वाचा...

    सामाजिक कार्य:
    इ. स. २०१० ते २०१२ पर्यंत सरपंच पदावर असतांना अनेक समाजविधायक कामे केली.
    १. इलेक्ट्रिक बल्ब (CFL) मंजुरी.
    २. नवीन शौचालय मंजुरी.
    ३. गुरांना पाणी पिण्यासाठी हौद मंजुर केले.
    ४. जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंतीसाठी मंजुरी.
    ५. झाडे लावा, झाडे जगवा मोहीम राबविली.