पत्रकार

sthapana-1st-election

पत्रकारीता

कापडणे गावाचे पत्रकारीतेच्या क्षेत्रातही जिल्ह्यात मोठे योगदान राहीले आहे. साहित्यिक रामदास वाघ यांनी १९८१ साली 'क्रांतीगंध' हे नियतकालीक सुरु केले. त्यानंतर २००१ साली 'गवशिव' हे अहिराणीतले पहीले नियतकालीक सुरु केले. त्या अर्थाने रामदास वाघ यांनी गावात पत्रकारीतेची मुहर्तमेढ रोवली. १९८९ साली पत्रकार संजय वाघ यांनी 'लोकमत' व 'आपला महाराष्ट्र' या दोन्ही दैनिकांचे कापडणे येथील वार्ताहर म्हणून पत्रकारीतेला सुरुवात केली, त्यानंतर 'लोकमत' मध्येच संजय वाघ यांना २६ वर्षाच्या काळात उपसंपादक, वरीष्ठ उपसंपादक, मुख्य उपसंपादक या पदांवर बढती मिळाली. १९८९ साली 'सकाळ' या वृत्तपत्राची खान्देश आवृत्ती सुरु झाल्यावर चंद्रकांत माळी 'सकाळ' चे कापडणे येथील बातमीदार झाले. त्यानंतर १९९२ साली सुनील वाघ हे 'सकाळ' चे बातमीदार झाले. त्यानंतर १९९५ पासून जगन्नाथ पाटील हे 'सकाळ' चे बातमीदार म्हणून काम बघत आहेत. चिंधू जगन्नाथ लोहार (लोहार सर) यांनी देखील 'लोकमत' या दैनिकाचे कापडणे येथील वार्ताहर म्हणून काम बघितले. १९९८ साली प्रा. आर. एन. पाटील यांनी 'रक्तबंधू' नावाचे साप्ताहिक प्रकाशित केले ते 'दै. गावकरी' चे कापडणे येथील वार्ताहर होते. त्यानंतर रविंद्र वाणी, प्रा. एस. एन. पाटील, आनंद माळी यांनी 'दै. गावकरी' चे वार्ताहर म्हणून काम बघीतले. रविंद्र वाणी यांनी 'जाहीरनामा' नावाचे साप्ताहिक देखील प्रकाशित केले. 'दै. लोकमत' चे कापडणे येथील वार्ताहर म्हणून कै. प्रवीण माळी, राहुल पाटील यांनी देखील काम बघीतले.

वृत्तपत्रांचे सध्याचे कापडणे प्रतिनिधी पुढीलप्रमाणे:

  • जगन्नाथ पाटील: सकाळ
  • रामकृष्ण पाटील: देशदूत
  • दिपक पाटील: लोकमत
  • जिजाबराव माळी: पुण्यनगरी