प्रशासन आणि लोकप्रतिनिधी

sthapana-1st-election

 • कॉम्रेड शरद पाटील:
  सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, इतिहासाचार्य, प्राच्यविद्यापंडीत. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२५, मृत्यु: १२ एप्रिल २०१४)
  अधिक वाचा...

  भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करत नवे सामाजिक आणि राजकीय संदर्भ निर्माण करण्यात शरद पाटलांचा मोलाचा वाटा होता. १९४५ मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधील शिक्षण अर्ध्यावर सोडून ते कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाले. १९७८ मध्ये शरद पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध लढेही उभारले. मराठी आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे. • माजी आमदार सदाशिव शंकर माळी:

 • अनंतराव पाटील:
  अनंतराव पाटील यांची ग्रंथसंपदा:
  अधिक वाचा...
  • वंदे मातरम
  • आवडी
  • झडीचे दिवस
  • उत्तरकार्य


 • रामदास वाघ: रामदास वाघ हे धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात राहणारे एक बहुभाषिक साहित्यिक आहेत.
  अधिक वाचा...

  एकाचवेळी ते इंग्रजी, हिंदी, मराठी, आणि अहिराणी या चार ही भाषांमधून लिखाण करतात. शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी व्याकरणासह हिंदी व मराठी व्याकरणासाठी त्यांची पुस्तके आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, आणि मराठी ही पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून अभ्यासली जातात. मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेखन, लघुकथा व वैचारीक लेखन या सर्व साहित्य प्रकारात त्यांचे लेखन उपलब्ध आहे. ते गावशीव या पहिल्या अहिराणी नियतकालिकाचे संपादकही आहेत. रामदास वाघ यांनी अहिराणी बोलीत लिहिलेल्या १२ कवितासंग्रहांचे प्रकाशन, १२ व्यक्तींकडून, १२-१२-२०१२ या दिवशी दुपारी १२ वाजून १२ मिनिटे या वेळी झाले. या उपक्रमाची नोंद ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने घेतली आहे.
  संकेतस्थळ: www.ramdaswagh.com • रोहिदास सखाराम पाटील: समाजप्रबोधनपर गीत लिहिण्याची आणि गायनाची आवड. (भ्रमणध्वनी: ८३०८०९७०७०)
  अधिक वाचा...

  मा. केंद्र मुख्याध्यापक, विसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदुरबार
  १. जनजागृती आणि समाजप्रबोधनपर गीत लिहिण्याची आणि गायनाची आवड गेली अनेक वर्ष ते जोपासत आहेत.
  २. त्यांनी गायिलेल्या गाण्यांची प्रातिनिधिक यादी खालील प्रमाणे:

  • मदिरेच्या नादा नरदेह बुडाला.
  • जरी पगार माझा थोडा आहे.
  • गाव माझा आदर्श बनवायचा आहे.
  • असा कसा उलटा जमाना (अहिराणी गीत)
  • भानावर यायला (गुटखा बंदी)
  • देशाभिमानाला सोडू नका.
  • बालपणी माझे लगीन लागले. (हुंडाबंदी)
  • चारचौघांची मैफिल जमविली.
  ३. अनेक भावगीते त्यांनी लिहिली आहेत.
  ४. कापडाण्यातील नुतन माध्यमिक विद्यालय, बोरसे हायस्कुल, आदर्श कन्या हायस्कुल मध्ये त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.
  ५. पुणे, जळगाव, चाळीसगांव, नावापुर, नंदुरबार, शिंदखेडा, विसरवाडी इत्यादी ठिकाणी त्यांनी भावगीते सादर केली आणि समारंभांमध्ये सत्काराचे मानकरीही ठरले.
  ६. गावात साक्षरता अभियान, बेटी बचाव मोहीम, व्यसनमुक्ती अभियान, स्वच्छता अभियान राबविणे.
  ७. नैतिकमुल्ये जोपासत हुंडाबंदी व बालविवाह प्रतिबंधक उपक्रम राबविणे.

 • संजय वाघ: २६/११ चे अमर हुतात्मे, खान्देशी प्रतिभासंगम, गंध माणसांचा ह्या साहित्यकृती प्रकाशित.
  अधिक वाचा...

  पुणे विद्यापीठातून एम. ए. (मराठी) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण तसेच एम. सी. जे. (मास्टर ऑफ कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम) ही पत्रकारीतेतील पदव्युत्तर पदवी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पूर्ण.

  • २६/११ चे अमर हुतात्मे: '२६/११ चे अमर हुतात्मे' हे पुस्तक २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित.
  • खान्देशी प्रतिभासंगम: खानदेशातील विविध साहित्यिकांच्या गाजलेल्या साहित्यकृतींच्या प्रस्तावनांचे संपादन 'खान्देशी प्रतिभासंगम' नावाने प्रकाशित.
  • गंध माणसांचा: कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता निरपेक्ष भावनेने समाजातील गोरगरीब, उपेक्षित, अंध, अपंग, निराधार, निराश्रितांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परीचय करून देणारे 'गंध माणसांचा' हे पुस्तक प्रकाशित.
  पुरस्कार:
  • खानदेशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार
  • अंकुर साहित्य पुरस्कार
  • पत्रकारीतेतील विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार

 • योगेश नथ्थु भामरे:
  नवोदित कवी योगेश भामरे यांचा 'कना' नावाचा अहिराणी कवितासंग्रह प्रकाशित.