इतिहासगावाच्या नावाची व्युत्पत्ती: कापडणे-कर्पटिन (वारकरी, भिकारी) कर्पटिस्थानं (संदर्भ: 'स्थलनाम-व्युत्पत्ति कोश' - इतिहासाचार्य राजवाडे).

धुळे जिल्ह्यातील नव्हे तर खान्देशातील कापडणे हे गाव स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान होते. येथील नागरिक सामाजिक राजकीयदृष्ट्या जागृत कार्यकर्त्यांचे जाळे म्हणून प्रसिद्ध आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक स्वातंत्र्यसैनिक म्हणून या गावाची आजही ओळख आहे. १९३० मध्ये सुरु झालेल्या दांडी यात्रेचा परिणाम म्हणून धुळे जिल्हा कायदेभंग मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यात झालेल्या सत्याग्रहात कापडणे गावातील स्वातंत्र्यसेनानींनी भाग घेतला. कापडणे येथे परदेशी कापडावर बहिष्कार घालून त्यांच्या होळ्या करण्यात आल्या. येथील कार्यकर्ते १९३० च्या सत्याग्रहात देखील सहभागी झाले होते.

येथील स्वातंत्र्यसैनिकांनी पुढील स्वातंत्र्य चळवळींमध्ये प्रामुख्याने सहभाग नोंदविला आहे :

 • १९३० दांडी यात्रा
 • १९३० चा मिठाचा सत्याग्रह
 • १९३२ ची दारू पिकेटिंग चळवळ
 • १९३३ चा झेंडा सत्याग्रह
 • १९४० मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेली वैयक्तिक सत्याग्रह चळवळ
 • १९४२ ची चलेजाव चळवळ
 • १९४४ चिमठाणा खजिना लुट

ग्रामपंचायत इतिहास:

कापडणे ग्रामपंचायतीची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात ०१ मार्च, १९३४ रोजी झाली. संपूर्ण खान्देशात प्रसिध्द असलेल्या ऐतिहासिक गावदरवाज्याच्या वास्तूतच ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय कार्यान्वित आहे.

कापडणे प्रथम ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे ऐतिहासिक छायाचित्र


खालची बाजू डावीकडून उजवीकडे: श्री. पोपट काशिराम बोरसे (सरपंच), श्री. आनंदा संपत पाटील, श्री. केवजी पुरमल महाजन (उपसरपंच), श्री. विनायक धाकू बोरसे, श्री. केशरलाल सुकलाल जैन, श्री. शंकर नथू महाजन, श्री. सुभान गणपत पाटील
वरची बाजू डावीकडून उजवीकडे: श्री. तुळशिराम गरबड पाटील (वसुली क्लार्क), श्री. हरचंद रामजी महाजन, श्री. नारायणराव शिवराम शिंदे (सेक्रेटरी), श्री. माधवराव दिवाण पाटील, श्री. नारायण दिपा भामरे, श्री. माइजी महारु भिल

आजतागायत सरपंच म्हणून मान मिळालेले मान्यवर पुढीलप्रमाणे:

 • श्री. पोपट काशिराम बोरसे
 • श्री. आनंदा संपत पाटील
 • श्री. विनायक धाकू बोरसे
 • श्री. राजाराम वाका पाटील
 • श्री. माधवराव दिवाण पाटील
 • सौ. शेवंताबाई माळी
 • श्री. विनायक तुळशीराम पाटील
 • श्री. कृष्णा विठोबा बोरसे
 • श्री. पंडीत पांडू माळी
 • श्री. अमृत राजाराम पाटील
 • कॉ. साहेबराव दिनकर पाटील
 • श्री. रघुनाथ रतन माळी
 • कॉ. भाऊराव नथ्थु पाटील
 • कॉ. रामदास विठ्ठल वाघ
 • श्री. अनिरुध्द रघुनाथ पाटील
 • कॉ. नारायण सोमा माळी
 • श्री. मधुकर काशिराम पाटील
 • श्री. सुरेश बाजीराव पाटील
 • सौ. कमलबाई सजन भामरे
 • श्री. झोपा खंडू पाटील
 • श्री. किशोर भास्कर पाटील
 • सौ. छाया चंद्रकांत पाटील
 • सौ. निर्मला भिमराव पाटील
 • सौ. इंदिरा विजय पाटील
 • सौ. रंजना विजय पाटील
 • सौ. रत्नाबाई जीवन माळी
 • श्री. राजेंद्र (भैय्या) साहेबराव पाटील