यशोदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, कापडणे, ता. जि. धुळे


।। साहसे श्री प्रतिवसती ।।
स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालित,
यशोदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, कापडणे

स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी अचूक मार्गदर्शन व अभ्यासासाठी आवश्यक ते सर्व पुस्तके / मासिके / इतर साहित्य एका छताखाली मोफत उपलब्ध करून देवून स्पर्धा परीक्षेसंदर्भात असलेले गैरसमज, न्युनगंड दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच कापडण्याच्या मातीतून व परिसरातून कार्यकर्ता अधिकारी घडविण्याच्या उदात्त हेतूने 'यशोदा' स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार अरुण पाटील यांच्या संकल्पनेतून आणि कापडण्यातील धडपडणाऱ्या तरुणांच्या सहकार्यातून 'यशोदा' स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरु झालेले आहे.