नुतन माध्यमिक विद्यालय, कापडणे, ता. जि. धुळे


नुतन माध्यमिक विद्यालय, कापडणे, ता. जि. धुळे या शाळेची सुरुवात खूप संघर्षमय झाली. इयत्ता ८ वीच्या प्रथम वर्गाचा दि. १५ जून २००८ रोजी शाळेचा पहिला दिवस माळीवाड्यातील माळीमढीत भरला. हळूहळू संख्या वाढू लागली. शिक्षकही जोमाने कामास लागले. गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय उराशी बाळगुन मुख्याध्यापक श्री. संतोष पंडीत एंडाईत यांनी नवनवीन प्रयोग केले, जसे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे व त्यात १००% विद्यार्थी सहभाग नोंदविणे. वाचन-लेखन, प्रश्नमंजुषा, विविध शैक्षणिक खेळातून ज्ञान, शालेय प्रार्थना व परिपाठात नवनवीन घटकांची भर इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. यात समर्थपणे साथ दिली ती शिक्षक श्री. दिपक प्रकाश माळी, श्री. भगवान आत्माराम माळी, श्री. विजय रावण माळी यांनी. याचा परिणाम म्हणून वर्ष २००९ पासून पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता पाचवीचा वर्ग सुरु करण्यात आला.

विविध नेत्यांच्या जयंत्या - पुण्यतिथ्यांचे औचित्य साधून समाजातील मान्यवरांना आमंत्रित करून व्याख्यानं, वृक्षारोपण, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर इ. स्पर्धा राबवून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात येतो. दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात, प्रजासत्ताक दिनी वार्षिक बक्षीस वितरण सोहळा असतो. विद्यालयातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी दरवर्षी केंद्रात चमकतात.

दिनांक १५ मार्च या दिवशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब देविदास गंगाराम खलाणे यांचे वडील तात्यासाहेब श्री. गंगाराम लावजी माळी यांची पुण्यतिथी असते, या दिवशी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असते. ज्यात सुमारे ५० ते ६० दाते रक्तदान करीत असतात. तसेच सायंकाळी किर्तन वा समाजप्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते. आतापर्यंत ह. भ. प. इंगळे महाराज बीडकर, ह. भ. प. निवृत्तीमहाराज देशमुख इंदुरीकर, सिंधुताई सपकाळ, समाजप्रबोधनकारसत्यपाल महाराज शिरसोलीकार इत्यादींची व्याख्याने व किर्तने झाली आहेत. तसेच तात्यासाहेबांच्या स्मरणार्थ सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात येते व वरील निमंत्रितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येते.

दि. ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'बालरंग' हा दोनदिवशीय सांस्कृतिक सोहळा होतो. ज्यात विद्यार्थी आपल्या अंगी असलेल्या गुणांचे प्रदर्शन करतात. त्याचप्रमाणे समाजातील ज्वलंत विषयांवर पथनट्यांमार्फत जनजागृती करण्यात येते. उदा. डेंग्यूपासून बचाव, लेक वाचवा इ. विषयांवर पथनाट्ये झालेली आहेत. होळीच्या पुर्वसंध्येला समाजातील मान्यवरांच्या हस्ते व्यसनांची व कचऱ्याची होळी करण्यात येते.

अ. नं. नाव पदनाम जन्मतारीख शै. पात्रता भ्रमणध्वनी
१. संतोष पंडीत एंडाईत मुख्याध्यापक ०२/०५/१९८१ एम. ए. बी. एड. ९९७०२७२७५७
२. दिपक प्रकाश माळी शिक्षक १४/०२/१९८२ बी. ए. बी. एड. ९४२१४४२६७८
३. अविनाश दंगल पाटील शिक्षक १९/०७/१९७० बी. ए. बी. एड. ८५५४८७५७५९
४. भगवान आत्माराम माळी शिक्षक ०१/०६/१९८० एम. ए. बी. एड. ९७६७५८७७६०
५. सुनिल छाबिलाल महाजन शिक्षक ०१/०४/१९७७ बी. एस्सी. बी. एड. ९०१११३७८४२
६. विनोद दशरथ शिरसाठ शिक्षक १०/०६/१९८० एम. ए. बी. एड. ९८६०८३६४१५
७. कैलास लहू ठाकरे शिक्षक २५/१०/१९८४ एम. ए. बी. एड. ७५८८१०३९२१
८. पुरुषोत्तम चिंतामण धनगर शिक्षक ०३/०२/१९९१ एच. एस. सी. डी. एड. ९४०४४०३२९१
९. श्रीमती गायत्री संताजी सोनवणे शिक्षिका ०८/१२/१९९१ एच. एस. सी. डी. एड. ९४०५११५३६९
१०. विजय रावण माळी शिक्षक ०५/०२/१९८५ एच. एस. सी. ए. टी. डी. ८८०६६४८२७२
११. धनराज विनायक माळी लिपिक १५/१०/१९८८ एच. एस. सी. ९४२०९४६५१६
१२. विकास साहेबराव पाटील शिपाई ०६/०२/१९८५ एच. एस. सी.
१३. पंकज अरुण भामरे शिपाई २७/०७/१९८० एच. एस. सी. ९९२१८३९९२७