कापडणे गाव (KAPADANE)


कापडणे हे खान्देशातील (महाराष्ट्र, भारत) धुळे जिल्ह्यात वसलेले एक गाव. सर्वाधिक स्वतंत्रता सेनानी असणारे गाव म्हणून कापडण्याची ख्याती आहे. भारतीय स्वतंत्रता संग्राम असो वा गोवा मुक्तीसंग्राम, येथील स्वातंत्र्यसैनिकांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य चळवळींमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.

गावाच्या नावाची व्युत्पत्ती: कापडणे-कर्पटिन (वारकरी, भिकारी) कर्पटिस्थानं (संदर्भ: 'स्थलनाम-व्युत्पत्ति कोश' - इतिहासाचार्य राजवाडे).

गावाच्या नावाचा 'कापडणा' (KAPADANA / KAPADNA) असा देखील नामोल्लेख केला जातो.

गावाचे नाव: कापडणे (KAPADANE / KAPADNE)
तालुका & जिल्हा: धुळे
राज्य: महाराष्ट्र
पिन कोड: ४२४ ३०७


 • स्थान:
  कापडणे हे राष्ट्रीय महामार्ग-३ जवळ स्थित आहे. हे राष्ट्रीय महामार्ग-३ पासून ३ किमी लांब आहे. देवभाने हे गाव राष्ट्रीय महामार्ग-३ आणि कापडणे यांना जोडणारा दुवा आहे.
 • वाहतूक सेवा:
  • रेल्वे:
   कापडण्याला रेल्वे स्थानक नाही, सर्वात जवळचे रेल्वे स्थानक गावापासून १५ किमी अंतरावर धुळे शहरात आहे.
  • रोड:
   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जोडला गेला आहे. बस आणि खाजगी प्रवासी वाहने कापडणे-देवभाने-धुळे दरम्यान प्रवाश्यांच्या दिमतीस हजर असतात.
  • हवाई:
   कापडण्याला विमानतळ नाही, सर्वाधिक जवळचे विमानतळ धुळे शहरात उपलब्ध आहे.
चालू घडामोडी
 • कापडण्यात पाऊसाचा हाहाकार...

  --- सकाळ, सोमवार ४ जून २०१८

  कापडणे परिसरात ८ जनावरे मृत्युमुखी; शेतजमीन गेली वाहून…!!!

 • कापडण्यात पाऊसाचा तांडव...

  --- दै. देशदूत, सोमवार ४ जून २०१८

  कापडण्यात ३० घरांमध्ये पाणी शिरले…!!!

 • ६० वर्षात प्रथमच कापडण्यात माजी विदयार्थोंचा स्नेहमिलन व गुरूऋण सोहळा संपन्न

  अधिक वाचा...(Click Here)
 • कापडणेकर अदिश्री पाटील हिला दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९७.२०% गुण

  अधिक वाचा...

  कापडणे येथील मूळ रहिवाशी व पनवेल स्थित कुमारी अदिश्री प्रमोद पाटील हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षेत ९७.२०% गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. ती येथील निवृत्त मुख्याध्यापक श्री. विठ्ठल श्रीराम पाटील व निवृत्त मुख्याध्यापिका सौ. निर्मला पाटील यांची नात असून पनवेल येथे स्थायिक आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड या कंपनीत सिनियर रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत श्री. प्रमोद पाटील यांची मुलगी आहे. अदिश्रीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समस्त कापडणेकरांच्या वतीने अदिश्रीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!

 • कापडणेकर संकल्प भामरे ह्याला दहावीच्या आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९५.६% गुण

  अधिक वाचा...

  कापडणे येथील मूळ रहिवाशी व पुणे स्थित संकल्प पाटील ह्याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या आयसीएसई बोर्डाच्या (ICSE Board) परीक्षेत ९५.६% गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. तो येथील निवृत्त मुख्याध्यापक श्री. रघुनाथ पाटील व निवृत्त मुख्याध्यापिका सौ. पाटील यांचा नातू असून पुणे येथे स्थायिक आणि टीसीएस या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत उच्च पदावर कार्यरत श्री. प्रविण भामरे (Delivery Head, TCS, Pune ) यांचा मुलगा आहे. संकल्पने अथक परिश्रमांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समस्त कापडणेकरांच्या वतीने संकल्पचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!

 • कापडणेकर प्रा. सचिन पाटील यांचे सेट परीक्षेत यश

  अधिक वाचा...

  कापडणे येथील मूळ रहिवाशी व धुळे येथील एसएसव्हीपीएस वरिष्ठ कला महाविद्यालयात पर्यावरण विषयाचे प्राध्यापक श्री. सचिन मनोहर पाटील यांनी पर्यावरण विषयात जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत यश मिळविले. ते विद्यावर्धिनी महाविद्यालयातील प्राध्यापक व संचालक श्री. एम. एल. पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते पर्यावरण विषयात सेट परीक्षेत यश प्राप्त करणारे प्रथम कापडणेकर आहेत. त्यांच्या या यशाने कापडणे आणि परिसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. समस्त कापडणेकरांच्या वतीने प्रा. सचिन पाटील, परिवार आणि त्यांच्या यशात सहभागी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!

 • कापडणे गावाचा नावलौकिक पोचला सातासमुद्रापार!

  --- अॅग्रोवन गुरुवार ११ जून, २०१५ (पान # ८)